Sunday, 8 February 2026

 आजीच्या स्वेटर्स / टोपीची उब :-


मेळघाटातील आदिवासींच्या तर्फे आम्ही महान ट्रस्ट, जयश्री वासुदेव फाटक आजी , वय शंभर उणे अकरा फक्त, यांचे फार आभारी आहोत. आपणा सर्वांना माहिती आहे की मेळघाट मध्ये हिवाळ्यात नेहमीच तापमान ५ डिग्रीपर्यंत किंवा त्यापेक्षा खाली उतरतं; आदिवासी लोक झोपड्यांमध्ये राहतात; थंडीपासून सुरक्षा म्हणून कोणत्याही विशेष सोयी नसतात अशा वेळेस लहान मुलांना ऊब मिळावी म्हणून पुण्याच्या आजींनी वयाच्या 89व्या वर्षी सुद्धा स्वतःच्या हाताने स्वेटर व टोपी यांचे 25 सेट्स विणले जे की महान संस्थेच्या वतीने, १७व्या वार्षिक प्लॅस्टिक सर्जरी कॅम्प दरम्यान , आदिवासींना वितरित करण्यात आले.
ह्या आजींचा थोडक्यात परिचय म्हणजे या आजी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका होत्या. शाळेच्या मुख्याध्यापक होत्या ,शिक्षण मंडळाचे पर्यवेक्षक व केंद्रप्रमुख ही पदे पण त्यांनी भूषविलेली आहे.
बयाच आधीपासून विणकाम करतात, घरच्यांसाठी करतातच /विणतातच पण बाहेरच्यासाठी सुद्धा विणतात व कुठलाही गाजावाजा न करता निरपेक्ष भावनेने दान करतात.
आजी तुमचे धन्यवाद
पुण्याच्या डॉ माया भालेराव यांच्या माध्यमातून आजी महान संस्थेशी जोडल्या गेल्या व त्यांनी स्वतः ते मेळघाटला आणले . मॅडम स्वतः गेली अनेक वर्ष कॅम्प ला येऊन महत्वचा हातभार लावतात . मॅडम धन्यवाद .
हे कॅम्प्स दरवर्षी १२५ ते १५०+ आदिवासींचे शाररिक व्यंग दूर करण्या निमित्ताने विनामूल्य करण्यात येतात . या वर्षी १३८
आदिवासींना याचा लाभ झाला.


No comments:

Post a Comment